5000 रुपये महिना….एक करोड तरुणांना कसे मिळणार? अर्थमंत्र्यांनी केला खुलासा।
1 min read
|








केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यांनी अर्थसंकल्पात 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यांनी अर्थसंकल्पात 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. देशातील 500 टॉप कंपन्यांमध्ये या तरुणांना इंटर्नशिप दिली जाईल. ही इंटर्नशिप 12 महिन्यांची असेल.
या तरुणांना नवीन कौशल्य शिकवलं जाईल आणि इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रही दिलं जाईल. इंटर्नशिपसाठी 21 ते 24 वर्षांचे तरुण अर्ज करु शकतात. अर्जदार पूर्णवेळ नोकरी करणारा किंवा विद्यार्थी नसावा अशी अट आहे.
IIT, IIM, IISER, CA, CMA सारख्या संस्थांमधील पात्र उमेदवारही अर्ज करु शकत नाहीत. इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसायला हवा.
तरुणांना इंटर्नशिप अलाऊन्स म्हणून 5000 रुपये दिले जातील. याशिवाय 6 हजारांचा वनटाइम अलाऊन्सही दिला जाईल.तरुणांना सरकारकडून दर महिन्याला 5 हजार रुपये दिले जातील असं निर्मला सीतारमन यांनी सांगितलं आहे.
अनेक कंपन्या आपलं कर्मचारी बळ वाढवत असताना 1 कोटी तरुणांना 5 वर्षात इंटर्नशिप मिळणं फार सोपं होईल असा त्यांचा दावा आहे. सरकार कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा करत आहे. आम्ही सर्व तयारी करुनच ही योजना आणली आहे. इंटर्नशिप नंतर कौशल्याच्या आधारे चांगली नोकरी मिळेल असं त्या म्हणाल्या आहेत.
About The Author
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
Recent Comments